IPL Schedule: यंदा कोरोनामुळे (Coronavirus) युएई (UAE) मध्ये 19 सप्टेंबर पासुन खेळवल्या जाणार्या आयपीएलचे यंंदाचे वेळापत्रक (IPL 2020 Timetable) उद्या म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याविषयी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांंनी माहिती दिली आहे. वास्तविक, 20 ऑगस्टपर्यंत स्पर्धेचे वेळापत्रक (IPL Schedule) जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, युएईमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांच्या (UAE Coronavirus Cases) पार्श्वभूमीवर बीसीसीआयला (BCCI) वेळापत्रक जाहीर करण्यात विलंंब झाल्याचे समजत आहे, तथापि, आताच्या अपडेटनुसार 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर मध्ये पार पडणार्या या लीगचे अधिकृत आणि अंतिम वेळापत्रक उद्या समोर येणार आहे. युएई मध्ये अबू धाबी (Abu Dhabi) , दुबई (Dubai) आणि शारजाह (Sharjah) अशा तीन ठिकाणी 56 दिवस होणाऱ्या स्पर्धेचे सामने खेळवले जातील अशी माहिती आहे.
दुसरीकडे, आयपीएल ला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना अनेक टीम्स मधील खेळाडु माघार घेत आहेत. अलिकडेच चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा केन रिचर्डसन आणि मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा यांनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मलिंगा आणि रिचर्डसन वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. IPL 2020 Update: आयपीएलच्या 13 व्या हंगामातून हरभजन सिंह आऊट, CSK गोलंदाजाने सोशल मीडियावर सांगितले 'हे' कारण
ANI ट्विट
Schedule of IPL 2020 that starts from 19th September in UAE will be released tomorrow: IPL chairman Brijesh Patel pic.twitter.com/NHnGZzohQS
— ANI (@ANI) September 5, 2020
दरम्यान, आयपीएल 2020 हे स्टार स्पोर्टस नेटवर्क च्या माध्यमातुन पाहायला मिळणार आहे.याशिवाय जर का तूम्हाला ऑनलाईन मॅचेस बघायच्या असतील तर त्या साठी Disney+ Hotstar.चा पर्याय सुद्धा आहे. याशिवाय आयपीएल संबधित सर्व अपडेट वेळच्या वेळी जाणुन घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला सुद्धा जरुर फॉलो करा.