IPL 2020 PlayOffs Qualification: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या डबल हेडर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा आणि दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) पभावर करत प्ले ऑफसाठी चुरस वाढवली आहे. विशेषतः हैदराबादच्या आरसीबीविरुद्ध (RCB) विजयाने प्ले ऑफचा गोंधळ अजून वाढवला आहे. आयपीएल 13च्या प्ले ऑफमध्ये (IPL PlayOffs) आजवर फक्त मुंबई इंडियन्सने स्थान निश्चित केलं आहे, तर शिल्लक असलेल्या तीन जागांसह सहा संघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. शिवाय, चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे आणि आता आरसीबीसाठी देखील प्ले ऑफचं गणित कठीण दिसत आहे. हैदराबादविरुद्ध 5 विकेटने पराभव त्यांचा सलग तिसरा पराभव होता आणि आता त्यांचा शेवटचा लीग-स्टेज सामना, दिल्ली कॅपिटलविरुद्ध (Delhi Capitals) व्हर्च्युअल नॉकआऊट सिद्ध होणार आहे. (RCB vs SRH, IPL 2020: आरसीबीच्या पराभवाची हॅटट्रिक! सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट 'विराट' विजय)
आरसीबी सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 14 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे, परंतु त्यांचा नेट रनरेट (-0.145) कदाचित त्यांच्या बाहेर पाडण्याचे कारण ठरू शकते. एका टप्प्यावर, आरसीबी 10 सामन्यात सात विजयांसह अंतिम चारच्या दिशेने जात होते पण चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि हैदराबादविरुद्ध पराभवामुळे त्यांच्या मोहिमेला धक्का बसला. बेंगलोरने दिलेल्या लक्ष्य हैदराबादने 35 चेंडू शिल्लक असताना गाठले ज्यामुळे आरसीबीच्या नेट रनरेटला मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीविरुद्ध पराभव देखील त्यांच्या प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडण्याची हमी देत नाही, अशा अनेक संभाव्य परिस्थिती आहेत जे आरसीबीला मागे टाकू शकतात.
बेंगलोरने दिल्लीविरुद्ध सामना गमावला आणि किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबाद त्यांचे उर्वरित सामने अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध जिंकले तर विराट सेना स्पर्धेतून बाहेर पडू शकते. अशा परिस्थितीत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि पंजाब यांचे प्ले ऑफ स्थान निश्चित होईल. आरसीबीचे एकूण गुण (14) केकेआर आणि किंग्ज इलेव्हनच्या बरोबरीचे असले तरी ते नेट रनरेटच्या आधारे मागे पडू शकतात.