CSK कर्णधार एमएस धोनी (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आजच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) सामन्यात आणखी एका विक्रमला गवसणी घातली आहे. धोनी आयपीएलमध्ये 100 झेल घेणारा (Dhoni IPL Catches) दुसरा विकेटकीपर ठरला. रविवारी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध धोनीने मैलाचा दगड गाठला. पंजाबचा कर्णधार केएल राहुल धोनीचा 100 वा बाली ठरला. पंजाबच्या डावाच्या 18व्या षटकात शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) राहुलला (KL Rahul) धोनीकडे झेलबाद केले. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक 195 सामन्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) 100 झेल घेणारा पहिला विकेटकीपर होता. कार्तिकने आजवर 186 आयपीएल सामन्यांत 103 झेल घेत या यादीत पहिले स्थान मिळवले आहेत. कार्तिकने आयपीएलमध्ये 133 झेल आहेत, जे टी-20 लीगमधील कोणत्याही क्रिकेटरने घेतलेले सर्वाधिक कॅच आहेत. कार्तिकने फील्डर म्हणून 30 कॅच घेतले आहेत. (KXIP vs CSK, IPL 2020: केएल राहुलचे शानदार अर्धशतक, KXIPचे विजयासाठी चेन्नई सुपर किंग्स समोर 179 धावांचे टार्गेट)

धोनीने 195 आयपीएल सामन्यात हा टप्पा गाठला आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेल पकडणारा धोनी क्रमवारीत अग्रस्थानी आहे. सीएसकेच्या कर्णधाराच्या नावावर 139 डिसमिसल्स आहेत, ज्यातील त्यापैकी 39 स्टंपिंग आहेत. कार्तिक 133 विकेटसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. रॉबिन उथप्पा कीपर म्हणून 90 विकेटसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये टॉप-5 विकेटकीपरच्या यादीत पार्थिव पटेल 66 झेलसह तिसऱ्या, नमन ओझा 65 कॅच घेऊन चौथ्या आणि रॉबिन उथप्पा 58 डिसमिसल्ससह पाचव्या स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

A century of catches 👐 MSD in yellow has done it again 👌🏻 #Dream11IPL #KXIPvCSK

A post shared by IPL (@iplt20) on

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीने आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनून इतिहास रचला होता. त्याने आयपीएलमध्ये 193 सामने खेळणारा आपला सहकाय सुरेश रैनाला मागे टाकले होते. रैनाने यंदा वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुसरीकडे, किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पहिले फलंदाजी करून पंजाबने 4 विकेट गमावून 178 धावा केल्या. कर्णधार राहुलने अर्धशतक ठोकले आणि 63 धावा केल्या. राहुलने मयंक अग्रवालसह पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली.