IPL 2019: राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात 'No Ball' वरुन झालेल्या वादात महेंद्र सिंग धोनी स्वस्तात सुटला- विरेंद्र सेहवाग (Watch Video)
M. S. Dhoni & Virendra Sehwag (Photo Credits: File Photo)

आयपीएल सीझन 12 मध्ये गुरुवार (11 एप्रिल) रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग (Chennai Super Kings) या संघाने राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 4 विकेट्सने मात केली. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये नो बॉल असूनही अम्पायरने नो-बॉल नसल्याचा इशारा दिल्याने महेंद्र सिंग धोनी भडकला. कॅप्टन कूलचा हा भडकलेला अवतार सर्वांसाठी नवा होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला; राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात 'No Ball' च्या निर्णयावर वाद

या रागाचा चांगलाच फटका धोनीला बसला असून त्याच्या मानधनातून 50% रक्कम कापण्यात आली आहे. लेव्हल टू च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धोनीला हा दंड ठोठावण्यात आला. या सर्व प्रकारावर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवाग म्हणाला की, "असा राग जर त्याला भारतीय संघासाठी आला असता तर मला आनंद झाला असता. आता पर्यंतच्या धोनीच्या कारकीर्दीत भारतीय संघासाठी असे रागवता त्याला कधी पाहिले नाही. चेन्नई संघासाठी धोनी जरा जास्तच भावूक झाला. धोनीला मैदानात येण्याची काही आवश्यकता नव्हती. उपस्थित फलंदाज अम्पायरशी बोलत होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात धोनी स्वस्तात सुटला. यासाठी त्याला 1-2 सामन्यांसाठी बंदी घालायला हवी होती."

पुढे सेहवाग म्हणाला की, "असे झाले तर अम्पायरची काही किंमतच राहणार नाही. त्याला शिक्षा झाली असती तर इतर कोणत्याही खेळाडूची पुन्हा असे वागण्याची हिंमत झाली नसती."

पहा व्हिडिओ:

 

नेमकं काय घडलं?

राजस्थान विरुद्ध चेन्नई या रंगलेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील 3 बॉल्स बाकी होते. चेन्नईला 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. त्यातील एक बॉल बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला, त्यानंतर पंच नो बॉलच्या इशारा केला. मात्र दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. हे पाहुन धोनी चांगलाच भडकला आणि अम्पायरशी यावरुन वाद घालू लागला.

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल मध्ये आतापर्यंत 6 सामने जिंकत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.