सुने लुस (Photo Credit: Instagram)

IND(W) vs SA (W) 2021: दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या (South Africa Women's Team) नियमित कर्णधार डेन व्हॅन निकेरकच्या (Dane van Niekerk) दुखापतीमुळे सुने लुस (Sune Luus) हिला भारताविरुद्ध आगामी मर्यादित ओव्हरच्या मालिकेत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. 7 मार्च पासून भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ पाच वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ शनिवारी भारतात पोहचली आणि आता 6 सहा दिवसाच्या क्वारंटाइननंतर यजमान संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरेल. दक्षिण आफ्रिकेने गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकणार्‍या 18 सदस्यीय संघातील बहुतेक खेळाडूंना कायम ठेवले आहे. नियमित कर्णधार डेन व्हॅन निकेरक आणि छोल ट्र्यॉन (Chloe Tryon) पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी संघाचा भाग नव्हत्या. अखेरच्या क्षणी झालेल्या दुखापतीमुळे मसाबाता क्लासला देखील संघातून वगळण्यात आले आहेत. (IND (W) vs SA (W) 2021: भारतीय महिला क्रिकेटचे कमबॅक, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे, टी-20 मालिकेसाठी BCCI ने घोषित केली टीम)

भारतीय दौऱ्यावरील मर्यादित ओव्हरचे सर्व सामना लखनौ येथे खेळवण्यात येणार आहेत. सहा दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर संघाचे, रविवारी 7 मार्च रोजी एकना स्टेडियमवर पहिल्या वनडेपूर्वी, दोन दिवसीय प्रशिक्षण सत्र पार पडेल. “या दौर्‍याची पुष्टी करून घेत आमच्या संघाची घोषणा येथे करण्यात आली हे खरोखर आनंददायक आहे आणि आमचा संघ वेगवेगळ्या खेळाच्या परिस्थितीत स्वत: ला सिद्ध करतात हे पाहण्याची आम्ही उत्सुक आहोत," मुख्य प्रशिक्षक हिल्टन मोरेंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले. खनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघात 7 मार्चपासून मर्यादित ओव्हरची मालिका खेळली जाणार आहे.

पहा दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ

सुने लूस (कॅप्टन), अयाबोंगा खाका, शबनीम इस्माईल, लॉरा वोल्वार्ड, त्रिशा चेट्टी (विकेटकीपर), सिनोलो जाफ्टा (विकेटकीपर), तस्मीन ब्रिट्झ (विकेटकीपर), मेरीझन कॅप, नोन्डुमिसो शांगसे, लिझेल ली (विकेटकीपर), अनेके बॉश, फाये ट्यूनिकलाइफ (विकेटकीपर), नॉनकुलुलेको मलाबा, मिगनॉन डू प्रीझ (विकेटकीपर), नाडिन डी क्लार्क, लारा गुडॉल, तूमी सेखुखून.