IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने (India) 44 धावांनी दमदार विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता 11 फेब्रुवारी रोजी याच मैदानात भारत आणि विंडीज संघ पुन्हा एकदा तिसऱ्या वनडे सामन्यासाठी आमनेसामने येतील. यावेळी रोहित ब्रिगेडचे लक्ष किरोन पोलार्डच्या विंडीज संघाचा क्लीन स्वीप करण्याकडे असेल तर पाहूणा संघ अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात यजमान टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत तीनही विभागात प्रभावी कामगिरी केली आणि त्यामुळे तिसरा व अंतिम सामना जिंकण्याचे देखील ते प्रबळ दावेदार असतील. तथापि मालिका अधिक टीम इंडियाच्या (Team India) खिशात असल्याने रोहित शर्मा बेंचवरील खेळाडूंना विंडीजचा क्लीन-स्वीप करण्याची संधी देईल की नाही हे पाहणे अजून बाकी आहे. (IND vs WI: ‘काय झालं तुला... नीट धावत का नाहीस? चल पळत जा’, फिल्डिंग सेट करताना युजवेंद्र चहलवर चिडला रोहित शर्मा Watch Video)
भारताचा नियमित एकदिवसीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संघात परतणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयानंतर पुष्टी केली. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर रोहित-शिखरची सलामी जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरेल. याशिवाय मधल्या फळीत टीम इंडिया अधिक बदल करणे अपेक्षी नसले तरी भारताच्या गेल्या सामन्यातील विजयाचा नायक सूर्यकुमार यादवला कदाचित विश्रांती दिली जाऊ शकते. आणि त्याच्या जागी उपलब्ध असल्यास श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करू शकतो. याशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंत मधल्या फळीत झळकत. यानंतर दीपक हुडा देखील आपले स्थान कायम ठेवेल. तर गोलंदाजी विभागात आगामी टी-20 मालिका लक्षात घेऊन शार्दूल ठाकूरला आराम देऊन दीपक चाहरचा समावेश केला जाऊ शकतो. चाहरने अखेरीस Proteas दौऱ्यावर सामना खेळला होता, ज्यामध्ये तीन विकेट घेऊन त्याने प्रभाव पाडला होता. तसेच युजवेंद्र चहलच्या जागी आता कुलदीप यादवला सामना खेळण्याची संधी मिळणार की नाही याकडे देखील अनेकांचे लक्ष असेल.
भारताचा संभावित प्लेइंग XI: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.