IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. आता रोहितसेनेकडे मालिका वाचवण्याचे लक्ष असणार आहे तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताला पराभूत करुन इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 249 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. शुभमन गिल 6 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 41/1
3RD ODI. 4.5: Asitha Fernando to Virat Kohli 4 runs, India 41/1 https://t.co/Lu9YkAmnek #SLvIND #3rdODI
— BCCI (@BCCI) August 7, 2024