
Indian Premier League Schedule 2020: अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) ची सुरुवात येत्या 29 मार्च (2020) रोजी मुंबई (Mumbai) येथील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथून होणार आहे. आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणार आहे. दिल्ली कॅपीटल्स संघाच्या एका अधिकृत व्यक्तीने सांगितले की, आयपीएल शुभारंभ करण्यासाठी 29 मार्च हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
आयपीएल अधिकाऱ्याने सांगितले की, मला सांगण्यात आले आहे की, आयपीएल 2020 ची सुरुवात 29 मार्च रोजी मुंबई येथून होईल. याचा अर्थ असा की, सुरुवातीच्या काळात खेळणाऱ्या काही संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इग्लंड आणि न्यूझिलँडच्या खेळाडूंचा समावेश सुरुवातीच्या काळात होऊ शकणार नाही. कारण की, या काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यू जिलँड यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे आणि इग्लंड आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट मालिका खेळली जात आहे. ही मालिका 31 मार्च रोजी संपणार आहे. (हेही वाचा, IND vs AUS ODI 2020: भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात D'Arcy Short याचा समावेश, सीन एबॉट Out)
एका फ्रँचाईजी सीनियर अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएल गवर्निंग काउन्सील पुन्हा एकदा जुन्या फॉर्मेटच्या आधारावर डबल हेडरचे आयोजन करणार आहे. ही टूर्नामेंट 1 एप्रिलपासून सुरु होईल. आयपीएल गवर्निंग काउन्सील या हंगामात जास्तीत जास्त डबल हेडर करण्याच्या विचारात आहे. असे केल्याने प्रेक्षकांना जास्तीत जास्त चांगला व्यूइंग टाइम मिळू शकेन.
दरम्यान, याच अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'ऑस्ट्रेलिया आणि न्यू जीलँड यांच्यात टी 20 सीरीज 29 मार्चला संपणार आहे. तर इग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टेस्ट सामना तांत्रिकी रुपात 31 मार्चला समाप्त होईल. यात 4 संघांना बड्या खेळाडूंची उपस्थिती सुरुवातीच्या सामन्यांमध्ये होणे कठीण आहे.'