PC-X

Indian Premier League 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांना वेध लागलेत ते आयपीएलचे (IPL 2025). इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीसाठी सर्व टीम सज्ज झाल्या आहेत. त्यातच एमएस धोनी (MS Dhoni) दिल्लीला रवाना झाला आहे. चेन्नई विमानतळावरील त्याचे फोटो समोर आले आहेत. धोनी 2025 च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळत आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, यावेळी सीएसके खेळणार आहे. आत्तापर्यंत त्यांनी सहावेळा जेतेपद पटकावले आहे. सीएसकेचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

2025 च्या हंगामात धोनीला सीएसकेने 4 कोटी रुपयांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. 2024 च्या हंगामात, धोनीने 11 डावांनंतर 220 च्या स्ट्राईक रेटने आणि 53.66 च्या सरासरीने 161 धावा केल्या. संपूर्ण हंगामात तो आठ वेळा नाबाद राहिला आणि पाच वेळा फिनिशरची भूमिका बजावली.Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर ठरला भारताचा 'सायलेंट हिरो'; कौतुक करताना नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

आयपीएलच्या इतिहासात धोनी सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 264 सामने आणि 229 डावांमध्ये 39.12 च्या सरासरीने 5,243 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 137.53 आहे. त्याने 24 अर्धशतके केली आहेत. सीएसके व्यतिरिक्त, तो 2016-17 ला रायझिंग पुणे सुपरजायंट (आरपीजी) कडूनही खेळला आहे.