Photo Credit- X

Indian National Cricket Team vs England National Cricket Team Yuvraj Singh on Abhishek Sharma: रविवारी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 135 धावांची खेळी केली. त्यानंतर माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) अभिषेक शर्माचे कौतुक केले. युवराज सिंगने त्याच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट शेअर केली. ज्यात 24 वर्षीय खेळाडू अभिषेक शर्माने शानदार खेळी केल्यानंतर, 'मला तुझ्यावर अभिमान आहे', असे युवराज सिंगने म्हटले. पाचव्या टी-20 मध्ये अभिषेकने 250 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. 24 वर्षीय या फलंदाजाने टी 20 मध्ये आतापर्यंत भारतीय फलंदाजाने केलेली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. (Sachin Tendulkar On Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीने सचिन तेंडुलकरचे जिंकले मन, मास्टर ब्लास्टरने खास व्हिडिओ केला शेअर)

युवराज सिंगने अभिषेक शर्माच्या शतकाचे कौतुक केले

युवराज सिंगकडून अभिषेकचे कौतुक

याआधी युवराज सिंगने अभिषेक शर्माच्या फलंदाजीबाबत सोशल मीडियावर अनेकवेळा उघडपणे उणीवा सांगितल्या होत्या. मात्र, यावेळी त्याने या युवा फलंदाजाचे मनापासून कौतुक केले. युवराज सिंगने एक्सवर लिहिले, ‘खूप छान अभिषेक शर्मा, मला तुझ्याकडून हेच ​​बघायचे होते. मला तुझा अभिमान आहे.’

इंग्लंडकडून फिल सॉल्टने 23 चेंडूत सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. याशिवाय इंग्लंडसाठी इतर कोणत्याही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे मोहम्मद शमीने पुनरागमन करताना तीन विकेट्स घेतल्या. शमीशिवाय अभिषेक शर्मा, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोईने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.