Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि 242 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 76 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने 77 चेंडूत 46 धावांची खेळी केली. बाबर आझमला 26 चेंडूत फक्त 23 धावा करता आल्या. शेवटी, खुसदिल शाहने 39 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. (हे देखील वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहलीने इतिहास रचला, सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला)

दुसरीकडे, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव व्यतिरिक्त हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकांत 242 धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकून टीम इंडिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करू इच्छिते.