IND vs NZ ICC WTC Final 2021 Live Cricket Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येणार? घ्या जाणून
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

IND vs NZ ICC WTC Final 2021 Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship 2021 Final) महामुकाबला आज होणार आहे. साऊथॅम्प्टनच्या रोज बाऊल मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर, केन विल्यमसन न्यूझीलंडच्या संघाची जबाबदारी संभाळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी जग्गजेतेपदाच्या सामन्याला भारतीय वेळेनुसार आज 3 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक अडीज वाजता सामन्याच्या नाणेफेकीला विराट आणि केन मैदानात जातील. भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुनील गावस्करांच्या साथीला माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची कॉमेन्ट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्याची सर्व क्रिकेट विश्वाला प्रचंड उत्सुकता लागली आहे. हे देखील वाचा- IND vs NZ ICC WTC Final 2021 Live Streaming and TV Telecast: भारत विरूद्ध न्युझिलंड सामन्याचे DD Sports Channel 1 वर पहा थेट प्रक्षेपण

संघ-

भारतीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंडचा संघ-

केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लँडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.