Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd T20 2024 Live Streaming: भारतीय संघ विरुद्ध बांगलादेश संघातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना उद्या 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकांत 127 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 11.5 षटकांत लक्ष्य गाठले. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताच्या नजरा दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका जिंकण्यावर असतील. दुसरीकडे पाहुणा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. दुसरा सामनाही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा टी 20 सामना कधी होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी 20 मालिकेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स नेटवर्क 18 वर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, चाहते स्पोर्ट्स18 1, स्पोर्ट्स 18 1 एचडी आणि स्पोर्ट्स 18 2 चॅनेलवर दुसरा टी-20 सामना पाहू शकतात. याशिवाय जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
दोन्ही संघांतील खेळडूंची यादी
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ होसेन आमोन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.