India vs Australia 2nd ODI 2019: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'विराट कोहली'ने रचले वनडे क्रिकेटमधील 40 वे शतक
Virat Kohli (Photo Credit: Getty Images)

India vs Australia 2nd ODI 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील त्याचे 40 वे शतक झळकावले आहे. टॉस हरल्यानंतर विराटसेना प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारतीय टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये सलामीवीर रोहित शर्मा माघारी परतला. तर 9 व्या ओव्हरमध्ये शिखर धवनला देखील माघारी धाडण्यात ऑस्ट्रेलिया संघाला यश आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार

सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहलीने डाव सावरला. त्याला अंबाती रायुडूने साथ दिली. दोघांनी 37 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अंबाती रायुडू देखील आऊट झाला.

विराट कोहली दमदार खेळी करत असताना भारतीय संघाची पडझड सातत्याने सुरुच होती. त्यात विजय शंकरने विराटची चांगली साथ दिली. दोघांनी मिळून 81 धावांची भागिदारी केली. 46 धावा करत विजय शंकरही माघारी परतला.