Team India (Photo Credit - X)

ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यात खेळला जाणारा सामना खराब आऊटफिल्डमुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताला कॅनडासोबत प्रत्येकी एक गुण शेअर करावा लागला. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताचे 7 गुण झाले असून ते गटात अव्वल स्थानावर आहे. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताचे सुपर-8 चे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. टीम इंडिया (Team India) आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर आहे, त्यामुळे सुपर-8 मध्ये ग्रुप वनमध्ये राहील. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिका यांचा पराभव केला आहे. (हे देखील वाचा: T20 WC 2024 Super 8 Scenario: भारतासह सहा संघ सुपर 8 साठी पात्र, या 10 संघांना मिळाले नारळ; जाणून घ्या संपूर्ण समीकरण)

19 जूनपासून सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-8 सामने 19 जूनपासून सुरू होत आहेत. सुपर-8 चे 8 संघ दोन गटात (1 आणि 2) ठेवण्यात आले आहेत. यामध्ये A1, B2, C1, D2 हे गट-1 मध्ये ठेवण्यात आले आहेत. तर A2, B1, C2 D1 गट 2 मध्ये ठेवण्यात आले आहेत. कॅनडाविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडिया ग्रुप वनमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाचे सध्या 7 गुण आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती +1.137 आहे.

जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, सुपर-8 मधील भारतीय संघाचे तीन सामने 20, 22 आणि 24 जून रोजी होणार आहेत. सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस क्रिकेट ग्राउंड येथे खेळवला जाईल. 22 जूनला भारताचा सामना बांगलादेश किंवा नेदरलँडशी होऊ शकतो. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. 24 जूनला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाहायला मिळणार आहे. हा सामना सेंट लुसिया येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाला ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना स्कॉटलंडविरुद्ध खेळायचा आहे.