Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी 2024 सुरू (Duleep Trophy 2024) झाली आहे. यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू खेळत आहेत. श्रेयस अय्यर भारत ड संघाचा कर्णधार आहे. केएस भरत आणि अक्षर पटेलही या संघात आहेत. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत भारत ब संघाकडून खेळत आहेत. मात्र सलामीच्या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी, अय्यर आणि भरत यांना विशेष काही करता आले नाही. टीम इंडियाला 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. (हे देखील वाचा: Duleep Trophy: सूर्यकुमार यादव आणि जडेजासह हे 6 भारतीय खेळाडूंना दुखापत, जाणून घ्या दुलीप ट्रॉफीच्या सर्व 4 संघांचा अपडेटेड संघ)
बंगळुरू येथे भारत अ आणि भारत ब यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारत ब संघ प्रथम फलंदाजी करत आहे. यशस्वी जैस्वाल संघाची सलामी देण्यासाठी आला होता. पण त्याला विशेष काही करता आले नाही. यशस्वी 59 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. खलील अहमदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सर्फराज खान अवघ्या 9 धावा करून बाद झाला. सर्फराजने टीम इंडियासाठी कसोटी सामने खेळले आहेत. मात्र बांगलादेश मालिकेपूर्वी या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताची चिंता वाढू शकते.
The India B batting lineup stumbles in the first innings of the Duleep Trophy 2024 👀#RishabhPant #YashasviJaiswal #IndiaB #DuleepTrophy #Sportskeeda pic.twitter.com/JeZHt4hh0u
— Sportskeeda (@Sportskeeda) September 5, 2024
अनंतपूर येथे भारत क आणि भारत ड यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात भारत ड संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 76 धावांवर संघाने 8 विकेट गमावल्या. अथर्व तायडे आणि यश दुबे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया डी संघासाठी सलामीला आले. यश 10 धावा करून बाद झाला तर अथर्व 4 धावा करून बाद झाला. श्रेयसही काही विशेष करू शकला नाही. तो 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर केएस भरत केवळ 13 धावा करून निघून गेला.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर संघाची घोषणा करू शकते. बोर्डाची निवड समिती खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आहे.