IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताचा पहिला डाव 471 धावांवर गारद, 41 धावांत गमावल्या 6 विकेट, गिल-पंत-जयस्वाल यांनी झळकावली शतके
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, भारताचा पहिला डाव दहा विकेट गमावून 471 धावांंवर गारद झाला आहे. त्याआधी भारताने पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 359 धावा केल्या होत्या.
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, भारताचा पहिला डाव दहा विकेट गमावून 471 धावांंवर गारद झाला आहे. त्याआधी भारताने पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 359 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: Rishabh Pant Century: शतक झळकावून ऋषभ पंतने इंग्लंडच्या भूमीवर रचला इतिहास, धोनीचा विक्रम काढला मोडीत)
India slide from 430/3 to 471 all out 👀https://t.co/ShJazRf4lJ | #ENGvIND pic.twitter.com/bsLQJNhdto
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 21, 2025
पहिल्या दिवशी इंग्लडंने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात दमदार सरुवात केली. सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल (42) बाद झाल्यानंतर लगेचच कसोटी सामन्यात पदार्पण करणारा साई सुदर्शन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर जयस्वाल 159 चेंडूत 101 धावा करुन बाद झाला. त्याने 16 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. त्यानंतर पंत आणि गिलने संघाची धुरा हाती घेतली. गिलने आपले शतक पूर्ण केले. पंत-गिलने मिळून 209 धावांची भागीदारी रचली. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शतक झळकावले.
तथापि, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली आणि 19.4 षटकांत 66 धावांत 4 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याने यशस्वी, सुदर्शन, करुण नायर आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून भारताच्या गतीला काही ब्रेक लावला. त्याच वेळी, ब्रायडन कार्सने 4 विकेट घेतल्या. जोश टंग आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट घेतली. सुरुवातीला इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत होती पण स्टोक्सने एका टोकावरून दबाव आणून पुनरागमन केले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 06:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

