Rishabh Pant Century: शतक झळकावून ऋषभ पंतने इंग्लंडच्या भूमीवर रचला इतिहास, धोनीचा विक्रम काढला मोडीत
दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant Century) शानदार शतक झळकावून नवा इतिहास रचला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऋषभ पंतने 146 चेंडूत षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. पंतने कसोटीत तिसऱ्यांदा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह, महेंद्रसिंग धोनीचा 11 वर्षे जुना खूप मोठा विक्रम मोडला गेला आहे.
IND vs ENG 1st Test 2025: इंग्लंडमधील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाजांची अद्भुत कामगिरी सुरूच आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यांनी शानदार शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant Century) शानदार शतक झळकावून नवा इतिहास रचला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऋषभ पंतने 146 चेंडूत षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. पंतने कसोटीत तिसऱ्यांदा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह, महेंद्रसिंग धोनीचा 11 वर्षे जुना खूप मोठा विक्रम मोडला गेला आहे. (हे देखील वाचा: Rishabh Pant Stats Against SENA: ऋषभ पंतने रचला इतिहास, एमएस धोनीचा विक्रम मोडला; बनला क्रमांक 1 यष्टिरक्षक)
𝙍𝙞𝙨𝙝𝙖𝙗𝙝 𝙋𝙖𝙣𝙩 𝙜𝙤𝙚𝙨 𝙥𝙖𝙨𝙩 𝙈𝙎 𝘿𝙝𝙤𝙣𝙞! 📣
He now holds the record for most Test tons by an Indian wicketkeeper. 💯🔥#ENGvIND #RishabhPant #TestCricket #Sportskeeda pic.twitter.com/iNu8rI3jxC
— Sportskeeda (@Sportskeeda) June 21, 2025
खरंतर, ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. पंतने धोनीला मागे टाकून ही मोठी कामगिरी केली आहे. 2005 ते 2014 दरम्यान धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून 6 शतके झळकावली. ऋषभ पंतने फक्त 44 कसोटी सामन्यांमध्ये 7 शतके झळकावण्याचा विक्रम रचला आहे. पंतचे इंग्लंडमधील हे तिसरे कसोटी शतक आहे. हे त्याचे SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 5 वे शतक आहे. यावरून पंतची बॅट परदेशी भूमीला शोभते हे दिसून येते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज
ऋषभ पंत - 7
एमएस धोनी - 6
वृद्धिमान साहा - 3
फारुख इंजिनियर - 2
बुद्धी कुंदरन - 2
कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. त्याने 96 कसोटी सामन्यांमध्ये 17 शतके झळकावली. अँडी फ्लॉवरने 12 शतके आणि इंग्लंडच्या लेस एम्सने 8 शतके झळकावली. त्यानंतर 5 यष्टीरक्षक-फलंदाजांनी 7 कसोटी शतके झळकावली आहेत.
कसोटीत सर्वाधिक शतके करणारे यष्टीरक्षक-फलंदाज
अॅडम गिलख्रिस्ट- 17
अँडी फ्लॉवर- 12
लेस एम्स- 8
एबी डिव्हिलियर्स- 7
ऋषभ पंत- 7
मॅट प्रायर- 7
कुमार संगकारा- 7
बीजे वॉटलिंग- 7
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 6230 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

