India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातला दुसरा टी-20 सामना (IND vs BAN 2nd Test) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium, Delhi) खेळवला गेला. या सामन्यात भारताने बांगालदेशचा 86 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेश 20 षटकात नऊ विकेट गमावून 135 धावा करु शकला.
भारतीय गोलंदाजाचा घातक मारा
टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि नितीश रेड्डी यांच्याशिवाय अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
2ND T20I. India Won by 86 Run(s) https://t.co/u89lLNwmd8 #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 9, 2024
नितीश रेड्डीची शानदार खेळी
त्याआधी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर अवघ्या 25 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी मिळून डाव सांभाळला. टीम इंडियाने 20 षटकात 9 विकेट गमावून 221 धावा केल्या. नितीश रेड्डी यांनी टीम इंडियाकडून सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. आपल्या स्फोटक खेळीदरम्यान नितीश रेड्डीने 34 चेंडूत चार चौकार आणि सात षटकार ठोकले. याशिवाय रिंकू सिंगने 53 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्या (32 धावा) जोडल्या.
दुसरीकडे, बांगलादेशकडून तस्किन अहमदने पहिले यश मिळवून दिले. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने सर्वाधिक तीन बळी घेतले. रिशाद हुसेन, हुसेन तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.