स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 10 व्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 317 धावांची विशाल धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी संघ अडचणीत असताना रेकॉर्ड-ब्रेक भागीदारी करून टीम इंडिया (Team India) साठी शानदार शतक झळकावले. आणि भारताने विश्वचषकात प्रथमच 300 धावांचा टप्पा पार केला. मंधानाने 119 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 123 धावांची ताबडतोड खेळी केली, तर हरमनप्रीत कौरने 107 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकार खेचून 109 धावा केल्या. मंधाना आणि हरमनप्रीत यांच्या या गेम चेंजर फलंदाजीनंतर सोशल मीडियात नेटकऱ्यांना विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनीची (MS Dhoni) आठवण करून दिली. (Smriti Mandhana, Harmanpreet Kaur यांच्या दमदार शतकी खेळीवर मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडून कौतुकाचा वर्षाव; पहा ट्वीट)

लक्षात घ्यायचे की स्मृती मंधाना आणि विराट कोहली यांचा जर्सी नंबर 18 आहे, तर हरमनप्रीत कौर आणि महेंद्र सिंह धोनी 7 क्रमांकाची जर्सी घालतात. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही तो त्याच क्रमांकाची जर्सी घालून आयपीएलमध्ये देखील उतरतो. मंधानाच्या शतकानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने लिहिले, “तर भारताच्या 18 व्या क्रमांकाच्या खेळाडूने आज शतक झळकावले आहे. याच क्रमांकाचा खेळाडू भारतासाठी गुलाबी चेंडू कसोटीत शतक झळकावणारा एकमेव खेळाडू आहे.” इथे जाफर विराट कोहलीला उद्देशून बोलत आहे.

मंधाना आणि हरमनप्रीतची फलंदाजी पाहून चाहत्यांना कोहली-धोनीची कशी आठवण आली ते पहा

तुम्ही ते आधी पाहिले आहे का?

भारतीय क्रिकेटमधील एक विशेष बंध

नंबर 18 आणि 7 फलंदाज खेळात जादू आणतात!

खूप प्रबळ संघ...

हमारी बहनें किसी से कम थोड़ी न हैं !

भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात सलामीवीर स्मृती आणि हरमनप्रीत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी शतकासह विक्रमी 184 धावांची भागीदारी केली. महिला विश्वचषकातील कोणत्याही विकेटसाठी भारताची ही सर्वोच्च भागीदारी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यस्तिका भाटियासह स्मृतीने टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. पण यस्तिकाची बाद झाल्यावर फलंदाजीला आलेली मिताली राज 5 आणि दीप्ती शर्मा 15 धावा करून स्वस्तात माघारी परतले. एक वेळ अशी होती की भारताने चांगली सुरुवात करूनही 78 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. तेव्हा फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीतने मंधानाच्या साथीने टीम इंडियाचा डाव सांभाळलाच पण मोठ्या धावसंख्येचा पाय रचला. मंधाना आणि हरमनप्रीतच्या या अप्रतिम भागीदारीमुळे भारताने पहिल्यांदाच विश्वचषकात 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे.