IND vs SL: अश्विनने कौतुकाने थोपटली रोहित शर्माची पाठ, कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीतील कामगिरीवर म्हणाला, ‘रवींद्र जडेजाचे द्विशतक व्हावे...’
रवींद्र जडेजा-आर अश्विन आणि रोहित शर्मा (Photo Credit; PTI)

IND vs SL Test 2022: अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्व क्षमतेची स्तुती केली आणि म्हटले की, नवनियुक्त कसोटी कर्णधाराने खेळात आणलेल्या सर्व डावपेचांच्या पलीकडे त्याच्यात एक मानवी घटक आहे. रोहितने गेल्या आठवड्यात कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत भारताला एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून देत मोहालीमध्ये श्रीलंकेचा (Sri Lanka) पराभव केला. बीसीसीआयच्या एका मुलाखतीत बोलताना अश्विनने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहितने आपली रणनीती अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतानाही संघातील प्रत्येकाची कशी काळजी घेतली यावर प्रकाश टाकला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पहिल्या डावात द्विशतक पूर्ण करावे अशी रोहितची इच्छा असल्याचे आणि त्याने तिसरा फिरकीपटू जयंत यादवला कसोटीच्या शेवटी षटके का दिल्याचे ऑफ-स्पिनरने सांगितले. (IND vs SL 1st Test 2022: विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीच्या डोक्यावर अश्विन ने वाजवला तबला, Video सोशल मीडियात जोरदार व्हायरल)

जडेजा नाबाद 175 धावांवर नाबाद असताना 574/8 वर पहिला डाव घोषित करण्यापूर्वी रोहितने खूप विचार केला आणि अष्टपैलू खेळाडूने संघ व्यवस्थापनाला त्याचे द्विशतक होईपर्यंत प्रतीक्षा करू नये सांगितले, असे अश्विनने म्हटले. “रोहित किती सामर्थ्यवान आहे आणि तो किती चांगला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्यात मला अनेक मानवी घटक दिसले. तो संघातील प्रत्येकाची काळजी घेत होता, प्रत्येकाला कसे वाटेल, संघाच्या कामगिरीसाठी प्रत्येकाचा आत्मविश्वास कसा महत्त्वाचा आहे,” अश्विन म्हणाला. दरम्यान अश्विनने सांगितले की रोहितने त्याच्या कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणाचा आनंद लुटला. तो म्हणाला की नवनियुक्त कर्णधाराने खेळाच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करून त्याचे स्वप्न पूर्ण केले.

“तिसरा फिरकीपटू जयंतला कमी षटक दिल्याने त्याला त्याची काळजी घ्यायची होती, गोलंदाजांना फिरवायचे होते. त्याने संपूर्ण सामन्यात वेगवान गोलंदाजांना एका टोकापासून कसे ठेवले. या सगळ्या डावपेचांच्या पलीकडे जाऊनही त्याने खेळ सोपा ठेवला. त्याला जेव्हा घोषित करायचे होते, तेव्हा त्याला जडेजाने द्विशतक झळकावायचे होते. अखेरीस, जड्डूनेच सांगितले की हे महत्त्वाचे नाही आणि तुम्ही घोषणेसाठी जावे. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल मला खात्री आहे की रोहित खूप अनुभवी आहे. मला वाटले की त्याने एक अभूतपूर्व काम केले आहे,” अश्विन पुढे म्हणाला.