KL Rahul (Photo Credit: Getty Images)

दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. बर्‍याच काळापासून खराब फॉर्ममधून जात असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याला संघातून वगळण्यात आले आहे. तर त्याच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला संघात स्थान देण्यात आले आहे. शुभमनला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. मागील एका वर्षात राहुलने टेस्ट क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केली आहे. शेवटच्या 12 कसोटी सामन्यात त्याने एकही अर्धशतक केले नाही. शिवाय, नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौर्‍यातील दोन कसोटी सामन्यांमधील 44, ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने दोन कसोटींमध्ये 101 धावा केल्या. (IND vs SA Test Squad: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट संघात केएल राहुल याला वगळले, शुभमन गिल याला संधी)

एकीकडे, रोहित शर्मा आणि शुभमन यांच्या समावेशाने सोशल मीडियावर चाहते खुश झाले आहेत. दुसरीकडे, राहुलच्या संधी न मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे अश्या प्रकारे चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया:

अधिक आनंद होऊ शकत नाही

केएल राहुल कसोटी संघाच्या बाहेर

हैप्पी टेस्ट रिटायरमेंट केएल राहुल

महान काम

मागील वर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये इंग्लंडच्या (England) दौर्‍यावर राहुलने अखेर कसोटी मॅचमध्ये 50 पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला होता. त्यानंतर तो कसोटीत अर्धशतकासाठी संघर्ष करत आहे. 2018 मध्ये राहुलने 12 टेस्टमध्ये 468 धावा केल्या होत्या आणि त्याची सरासरी फक्त 22.28 होती. 2019 मध्ये त्याने यावर्षी आजवर तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याची सरासरी 22 आहे. राहुलची परदेशात सरासरी फक्त 30 आहे जी स्तरहीन आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अशा मजबूत संघांविरुद्ध त्यांची सरासरी 40 च्या खाली आहे. सलामीच्या फलंदाजासाठी ती चांगली मानली जात नाही. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या टीम इंडियामधील जागेवर प्रश्न उपस्थित झाले होते. विश्वचषकात रोहितने 5 शतके ठोकली होती आणि ज्यानंतर त्याला कसोटी संघात संधी देण्याची मागणी जोर धरत होती.