काही दिवसांपूर्वीच भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) मालिका पार पडली. त्यानंतर आता या दोन्ही संघाने टी २० विश्वचषकात (T20 World Cup) वर्णी लावत विविध संघाविरुध्द उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताने यापूर्वी नेदरलॅंड (Netherland) आणि पाकिस्तान (Pakistan) विरुध्द दणदणीत विजय मिळवला असला तरी आजची लढत भारताचा टी२० चषकातील (T20 World Cup) पुढील प्रवास ठरवणारी आहे. पराभव दोन्ही बाजूंसाठी अंतिम ठरणार नसला तरी, उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी विजय महत्वाचा आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत.
टी२० विश्वचषकातील (T20 World Cup) आतापर्यंत पाऊस किंवा पराभवाचा अनुभव न घेतलेला भारत (Team India) हा एकमेव संघ आहे. विराट कोहलीने दिलेला एक तणावपूर्ण विजय,टॉप इलेव्हनमधील (Top 11) विविध ठिकाणांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि भारतीय गोलंदाजांचा परफॉर्मस (Indian Bowlers) हे टीम इंडियाचे वैशिष्ट्य आहे. तरी आजचा सामना कोण जिंकणार याबाबतची उत्सुकता भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघास लागली आहे. (हे ही वाचा:- IND vs SA Head to Head: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रविवारी होणार सामना, कोण आहे कोणावर वरचढ घ्या जाणून)
रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (K L Rahul), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) (विकेटकीपर), अक्षर पटेल (Axar Patel), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar), मोहम्मद शमी (Mohhamad Shami), अर्शदीप सिंग (Arshadeep Singh). हे खेळाडू टॉप एलेव्हनमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.