दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध 3 सामन्यांच्या तिसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यात टॉस जिंकून भारताने (India) पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या रांचीमधील मॅचसाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी शाहबाझ नदीम (Shahbaz Nadeem) याला संघात स्थान मिळाले आहेत. या मॅचसह नदीम टेस्टमध्ये डेब्यू करेल. आजच्या टॉसचा विशेष आकर्षण राहिला तो आफ्रिकी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis). तिसऱ्या टेस्टआधी डू प्लेसिसने पत्रकार परिषदेत सांगितले होते की यंदा टॉससाठी आफ्रिका संघाचा अन्य कोणता खेळाडू मैदानात उपस्थित राहील, पण असे झाले नाही आणि डू प्लेसिस स्वतः टॉससाठी हजर राहिला. तिसऱ्या मॅचच्या टॉसपूवी फाफ डू प्लेसिसने आशियामध्ये सलग 9 टॉस गमावले होते आणि आजही टॉससाठी भाग्याने त्याचा साथ दिला नाही आणि त्याने सलग 10 वा टॉस गमावला. (IND vs SA 3rd Test: कर्णधार विराट कोहली याच्या निशाण्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड)
यापूर्वी, भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी मालिका जिंकली आहे. आणि आजच्या सामन्यात विजय मिळवत क्लीन-स्वीप पूर्ण करण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुणेमध्ये देखील भारतीय संघाने विजय मिळवला होता. पुणेमध्ये भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातली. दुसरीकडे, आफ्रिकन संघ तिसरी कसोटी जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करू इच्छित असेल.
Big day for Shahbaz Nadeem as he is all set to make his Test debut 🇮🇳🇮🇳 #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/3hfYTaVyDL
— BCCI (@BCCI) October 19, 2019
असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्लेयिंग इलेव्हन:
भारत: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमेश यादव आणि शाहबाझ नदीम.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गार, क्विंटन डी कॉक, जुबैर हमजा, फॅड डु प्लेसिस (कॅप्टन), टेंबा बावुमा, हेनरिक क्लॅसेन, जॉर्ज लिंडे, डेन पीट, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, आणि लुंगी एनगीडी.