मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter)

IND vs NZ WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या पाचव्या दिवशी मोहम्मद शमीने (Mohammed Sham) आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवले, परंतु आपल्या खास शैलीने चाहत्यांची मने जिंकली. पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर शमीने 2 न्यूझीलंड (New Zealand) फलंदाजांना पॅव्हिलियनचा  रास्ता दाखवला. पहिले वेगवान गोलंदाजाने अनुभवी किवी फलंदाज रॉस टेलरला तंबूत धाडलं त्यानंतर शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या बी. जे वॅटलिंगच (BJ Watling) त्रिफळा उडवत किवी संघाला मोठा धक्का दिला. शमीने अप्रतिम बॉल टाकत वॅटलिंगला बोल्ड करत तंबूत धाडलं. फलंदाजाला शमीचा स्विंग बॉल समजू शकला नाही आणि बोल्ड होऊन माघारी परतला. न्यूझीलंडच्या यष्टीरक्षक फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर शमी फिल्डिंगला गेला, त्यानंतर तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला. (IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात Virat Kohli याची मस्ती पाहून Rohit Sharma याची रिअक्शन एकदा पाहाच Watch Video)

सुरुवातीला शमीने बाऊंड्री लाइनवर क्षेत्ररक्षण करताना टॉवेलने ओढलेला दिसला आणि पंचांनी दुपारच्या जेवणाची वेळ जाहीर केली तेव्हा सोशल मीडियावर शमी टॉवेलमध्येच मैदानावरून ड्रेसिंग रूममध्ये परतताना दिसला. शमीच्या या कृतीने सोशल मीडियावर यूजर्सचं लक्ष वेधलं असून याचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे शमीने हे सर्व महिला प्रेक्षकांसमोर केलं. बाउंड्री लाईनवर शमी लंचच्या काही वेळेपूर्वी स्वतःला टॉवेलमध्ये गुंडाळताना दिसत आहे. या दरम्यान मागे बसलेली महिला प्रेक्षक देखील शमीच्या कृतीची नकल करताना दिसत आहे.

शमीची नवीन स्टाईल पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत. टॉवेलमध्ये शमीला पाहून एका यूजरने म्हटले की, 'हा शमीचा नवीन ड्रेस कोड आहे,' तर दुसर्‍या यूजरने शमीच्या टॉवेल्समध्ये चालण्याच्या शैलीचे आश्चर्यकारक म्हणून वर्णन केले आणि लिहिले की, 'शमी मैदानात लुंगी नाचण्यास सज्ज झाला आहे.' साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) असलेल्या थंड हवामानामुळे वेगवान गोलंदाजाने स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला. आपली पाठ उबदार ठेवण्यासाठी - ते असे करताना दिसला. परंतु चाहत्यांना शमीची कृती गमतीशीर वाटली आणि त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शमी आणि त्याचा टॉवेल

शमी... काजोलचा टॉवेल डान्स करतोय

पावसाचा परिणाम

"मेरे ख्वाबों में जो आये .."

लुंगी डान्स!

लंचची वेळ झाली तेव्हा न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून 135 धावा केल्या होत्या शमीने 2 आणि ईशांत शर्माने 3 गडी बाद केले आहेत. अश्विनने आतापर्यंत एक विकेट घेतली आहे. किवी कर्णधार केन विल्यमसनकडून अत्यंत संयमी खेळीचे दर्शन घडत आहे.