मार्टिन गप्टिल (Photo Credit: PTI)

रांची (Ranchi) येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम स्टेडियमवर येथे भारताविरुद्ध (India) 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) सलामीवीर मार्टिन गप्टिलने (Martin Guptill) शुक्रवारी भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. उल्लेखनीय म्हणजे, टी-20 विश्वचषकातून (T20 World Cup) भारत लवकर बाहेर पडल्यानंतर टी-20 कर्णधार पदावरून पायउतार झालेल्या कोहलीला सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा गप्टिल आता या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने 15 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह एकूण 31 धावा केल्या. गप्टिलच्या खात्यात आता 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3248 धावा झाल्या आहेत. या दरम्यान त्येनं दोन शतके आणि 19 अर्धशतके केली आहेत. (IND vs NZ 2nd T20I: किवींविरुद्ध टीम इंडियाने तगडा गोलंदाज उतरवला मैदानात, माजी दिग्गज क्रिकेटपटूने दिली डेब्यू कॅप, पहा Video)

लक्षात घ्यायचे की गप्टिलला भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी 11 धावांची गरज होती जिथे त्याने रांचीमध्ये त्याच्या संघाच्या डावाच्या तिसऱ्या षटकात गाठले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर गप्टिलने या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरमध्ये हल्लाबोल करत विक्रम मोडीत काढला आणि सलग 2 चौकार ठोकले. आजच्या सामन्यात नशिबाने त्याची साथ दिली आणि गप्टिल 8 धावांवर फलंदाजी करत असताना एका महत्त्वाच्या षटकात 14 धावा करून खेळताना केएल राहुलने त्याला झेल सोडला. दरम्यान, कोहली आता या यादीत 95 सामन्यांत 29 अर्धशतकांसह 52.04 च्या सरासरीने 3227 धावांसह भारताचा नवनियुक्त टी-20 कर्णधार रोहित शर्माच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचा नवनियुक्त टी-20 कर्णधार रोहित शर्मा 3086 धावांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रोहितने 4 आंतरराष्ट्रीय टी-20 शतके केली आहेत, पण 2018 पासून या फॉरमॅटमध्ये तो तीन आकड्यांचा टप्पा पार करू शकलेला नाही. उल्लेखनीय म्हणजे, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक 50+ पेक्षा जास्त स्कोअर असलेल्या फलंदाजांच्या यादीत कोहली आणि रोहित अनुक्रमे 29 आणि 28 सह आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंच (2608 धावा) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (2570 धावा) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.