IND vs NZ 2nd ODI 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
विराट कोहली आणि टॉम लाथम (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 3 वनडे मालिकेचा दुसरा सामना ऑकलंडच्या (Auckland) इडन पार्क (Eden Park) मैदानावर खेळला जाईल. सध्या भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. जानेवारी 2019 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरच्या मालिकेत भारताला 4-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. अखेरच्या तीन वनडे मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रॉस टेलर (Ross Taylor) याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. किवी संघाविरुद्ध आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. दुसरीकडे, किवी संघ टी-20 मालिका गमावल्यावर वनडे मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. (IND vs NZ 2nd ODI: टीम इंडियासमोर दुसऱ्या वनडेत 6 फूट 8 इंच उंचीच्या काइल जैमीसन याचे आव्हान, ऑकलंडमध्ये डेब्यूसाठी सज्ज)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी ऑकलँडच्या ईडन पार्कवर खेळला जाईल. दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरा एकदिवसीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट होईल. सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

हॅमिल्टनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 50 ओव्हरमध्ये 4 गडी राखून 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 48.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 348 धावा केल्या आणि सामना जिंकला. यजमान संघाने क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. सामन्यात मोठा स्कोर करूनही टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.

भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर.

न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.