विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

IND vs ENG 3rd Test: भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चाहते प्रतीक्षा जवळपास दोन वर्षांपासून करत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डन्सवर विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर विराटने 49 आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत, परंतु प्रत्येक वेळी शतकाचा घास तोंडाजवळ होऊन हिरावला आहे. तसेच या दरम्यान त्याने प्रत्येक वेळी खराब कामगिरी केली असेही नाही. विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात असेल, पण तो लवकरच असा विक्रम करणार आहे, जो त्याच्यासह करोडो भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद हसू आणेल. इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स (Leeds) येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे आणि भारताची ‘रनमशीन’ कोहलीसाठी हा सामना महत्वपूण ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा मैलाचा दगड गाठण्यापासून विराट फक्त काही धावा दूर आहे. (India Likely Playing XI 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडिया करणार मोठा फेरबदल, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 23,000 धावांच्या या विक्रमापासून विराट कोहली फक्त 63 धावा दूर आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत 437 सामन्यांमध्ये 22,937 धावांची नोंद आहे. इतकंच नाही विराट हा पल्ला सर करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज ठरेल. भारतासाठी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासारख्या दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिनच्या नावे 34,357 धावा आहेत तर द्रविडने 24,208 धावा केल्या आहे. या दोन खेळाडूंशिवाय श्रीलंकेचा कुमार संगकारा, महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघ अतिशय मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. दुसरीकडे, जो रूटचा इंग्लिश मालिकेत बरोबरी करण्यासाठी धडपडत आहे. इंग्लंड संघ फलंदाजीत संपूर्णपणे कर्णधार रूटवर आधारित आहे तर गोलंदाजी विभागात जेम्स अँडरसन व ओली रॉबिन्सनने सर्वोत्तम योगदान दिले आहे. तसेच सॅम कुरन दुसऱ्या सामन्यात बॅट तथा बॉलने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. अशास्थितीत इंग्लंड संघाला सुधारित रणनीतीने लीड्स कसोटी सामना खेळण्याची गरज आहे.