IND vs AUS 4th Test 2021: अरे बाप रे! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे 19 खेळाडू उतरले मैदानावर, 59 वर्षानंतर भारतीय संघावर ओढवली अशी नामुष्की
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) चौथ्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) ब्रिस्बेनमध्ये कसोटी (Brisbane Test) पदार्पण केले.  या मालिकेदरम्यान एकूण 5 खेळाडूंना भारताकडून (India) कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर 59 वर्षांनंतर तब्बल डझनभर खेळाडू एका मालिकेत भारताकडून खेळले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Bordar-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेचा शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघात (Indian Team) चार बदल झाला आहे आणि दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. आर अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर पडले आहे तर मयंक अग्रवाल आणि शार्दुल ठाकूर परतले आहेत. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना टेस्ट डेब्यूची संधी मिळाली आहे. (IND vs AUS 4th Test Day 1: टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीनंतर लाबूशेन-स्मिथची संयमी खेळी, ब्रिस्बेन टेस्टमध्ये लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 65/2)

यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा संघासाठी त्रासदायक सिद्ध झाला आहे. इशांत शर्मा यापूर्वीच दुखापतीमुळे दौऱ्यावर सामील होऊ शकला नाही तर मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत जडेजा मालिकेतून बाहेर पडले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाने विदेशी दौऱ्यावर पहिल्यांदा एका मालिकेत एकूण 19 खेळाडू खेळवले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 1983/84 दौऱ्यावर भारतीय संघाने यापूर्वी 18 किंवा अधिक खेळाडू खेळवले होते. शिवाय, मालिकेत 1996 नंतर पहिल्यांदाच 5 खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची पहिलीच वेळ आहे. या दौर्‍यावर मोहम्मद सिराज, शुभमन गिल, नवदीप सैनी, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कसोटी डेब्यू केलं आहे. यापूर्वी, 1996 दौर्‍यावर सुनील जोशी, प्रवीण महांब्रे, प्रसाद, विक्रम राठौर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी कसोटी पदार्पण केलं होतं.

भरात-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेचा चौथा आणि अंतिम सामना ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर खेळला जात आहे.