मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty)

IND vs AUS 3rd Test Day 1 Stumps: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) आजपासून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia)-भारत (India) संघातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Tropgy) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. सिडनीमध्ये पहिल्या दिवसाखेर यजमान कांगारू संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 55 ओव्हरमध्ये  2 विकेट गमावून 166 धावांपर्यंत मजल मारली आहे. पावसानेखोळंबा केलेल्या पहिल्या दिवशी यजमान संघासाठी पदार्पणवीर विल पुकोव्हस्कीने 62 धावा केल्या, तर मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) नाबाद 67 आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) नाबाद 37 धावा करून खेळत होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे, त्यामुळे दोन्ही संघ सिडनीमध्ये विजय मिळवत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज आज ऑस्ट्रेलियन फलंदाजांपुर्ढे निरुत्तर दिसले. मोहम्मद सिराज आणि नवख्या नवदीप सैनीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (Rishabh Pant Drops Will Pucovski Twice: अरेरे! रिषभ पंत याच्याकडून कॅच सुटला, विल पुकोव्हस्कीला दुसऱ्यांदा मिळाले जीवनदान, पहा Video)

पुकोव्हस्कीसह दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करणाऱ्या डेविड वॉर्नर सलामीला आला. वॉर्नरला सिडनीचे मैदान कसोटीसाठी नेहमी आवडीचे ठरले आहे कारण म्हणजे की हे त्याचे घरचे मैदान आहे. या मैदानावर त्याने शानदार खेळी केल्या आहेत, मात्र आजच्या सामन्यात तो फेल झाला आणि अवघ्या 5 धावा करून माघारी परतल्या. त्यानंतर पुकोव्हस्कीने लाबूशेनच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. यादरम्यान पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या पुकोव्हस्कीने 97 चेंडूत टेस्टमध्ये पहिले अर्धशतक ठोकले. दोघांची भागीदारी संघासाठी डोकेदुखी ठरत असताना सैनीने युवा कांगारू फलंदाजाला पायचीत करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अखेर, लाबूशेनने स्मिथच्या साथीने दिवसाखेर धावसंख्या दोनशेच्या जवळ नेली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. यावेळी स्मिथ आपल्या जुन्या अवतारात दिसला. पहिल्या दोन सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या स्मिथने चेंडूत नाबाद धावा केल्या आहेत.

आजपासून सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पुकोव्हस्की तर टीम इंडियाकडून नवदीप सैनीने कसोटी पदार्पण केले. विशेष म्हणजे, सैनीची पहिली आंतराष्ट्रीय कसोटी विकेट ही पुकोव्हस्कीच ठरली. सैनीने पुकोव्हस्की 35व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करत त्याचा दमदार टेस्ट डेब्यू डाव गुंडाळला.