मोहम्मद सिराज वर्णद्वेषी टिप्पणी (Photo Credit: PTI)

Sydney Test Racial Abuse Row: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान सिडनी (Sydney) येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात वर्णभेद संदर्भात मोठा वाद निर्माण झाला आहे. सिडनी कसोटीच्या (Sydney Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी वाद आणखी वाढला जेव्हा काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) वर्णभेदात्मक अपशब्द वापरत असल्याचे समोर आले. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणारा सिराजने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 86व्या ओव्हरमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) आपली नाराजी व्यक्त केली. अजिंक्यने थेट मैदानावरील अंपायरला याबद्दल माहिती दिली आणि संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितले. यानंतर सामना बराच वेळ थांबवण्यात आला टिप्पणी करणार्‍या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून दिले गेले. संपूर्ण क्रिकेट विश्वातून याबद्दल कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जात असताना सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्टॅन्डमधील प्रेक्षक सिराजवर टिप्पणी करताना ऐकू येऊ शकतात. (IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टमध्ये मोहम्मद सिराज याला वर्षद्वेश भोवला, तक्रारीनंतर पोलिसांनी केली कारवाई)

सिराजवर केलेल्या वर्णद्वेशी टिप्पणीचा कथित व्हिडिओ म्हणून सोशल मीडियावर एका ट्विटर यूजरची पोस्ट व्हायरल होत आहे. सोमवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पापोस्ट करण्यात आला ज्याची शूटिंग फोनमधून स्टॅन्डमधील एका चाहत्याने केलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रेक्षक “सिराज...सिराज! असे ओरडताना ऐकू येते आणि दुसरी व्यक्ती “आम्हाला हात दाखव” असे ओरडताना ऐकू येत आहेत. परंतु ट्विटर यूजरच्या पोस्टवर प्रतिसाद देणार्‍या बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की “ब्राउन डॉग” अशी वर्णद्वेशी टिप्पणी ऐकू येत आहे. हा व्हिडिओ चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान बनवण्यात आल्याचे म्हटले जात आहे याकडे सिराजने दाखल केलेल्या तक्रारीचे कथित ‘पुरावा’ म्हणूनही पहिले जात आहे.

दरम्यान, सिराज आणि भारतीय संघाच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस काही चाहत्यांना तेथून मैदानाबाहेर करण्यात आलं. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने औपचारिक निवेदन जाहीर करत टीम इंडियाची माफी मागितली आणि योग्य ती कारवाई केली जाण्याची हमी दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की अशा चाहत्यांची गय केली जाणार नाही. सिराजसह घडलेल्या या घटनेनंतर आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंकडून प्रकरणाची निंदा केली गेली. विराट म्हणाला की “हा असभ्य वर्तनाचा कळस, हे खपवून घेतलं जाणार नाही.”