IND vs AUS 2nd Test Day 1: टीम इंडियाची दमदार सुरुवात; लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 65 धावांवर गमावल्या 3 विकेट, स्टिव्ह स्मिथ पुन्हा फेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd Test Day 1 2020: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारू संघाने लंचपर्यंत 3 विकेट गमावून 65 धावांपर्यंत मजल मारली आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्स आणि स्टिव्ह स्मिथ भोपळा न फोडता माघारी परतले. मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापूर्वी आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली व आघाडीच्या कांगारू फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. अश्विनने 2 तर बुमराहला लंचपर्यंत 1 विकेट मिळाली. मार्नस लाबूशेन आणि ट्रेव्हिस हेडच्या जोडीवर आता संघाचा डाव सावरत मोठा स्कोर करण्याची जबाबदारी आहे. लाबूशेन नाबाद 15 आणि हेड नाबाद 3 धावा करून खेळत आहेत तर भारतीय गोलंदाज देखील त्यांच्यावर दबाव कायम ठेवण्याच्या प्रयत्नत आहेत. (IND vs AUS 100th Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100व्या टेस्ट मॅचसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात, 'या' संघाविरुद्ध खेळले सर्वाधिक कसोटी सामने)

बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा एकदा वेड आणि बर्न्सची जोडी मैदानावर उतरली, मात्र पुन्हा एकदा मोठी भागीदारी करण्यास अपयशी ठरली. अवघ्या 10 धावसंख्येवर बुमराहने बर्न्सला माघारी धाडलं आणि संघाला आक्रामक सुरुवात करून दिली. वेड एकाबाजूने डाक सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना स्मिथच्या अपयशाचे सत्र सुरूच राहिली. अश्विनच्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराकडे झेलबाद होत स्मिथ शून्यावर माघारी परतला. त्यानंतर अश्विनने संघाला पुढील ओव्हरमध्ये आणखी एक धक्का दिला. अश्विनच्या चेंडूवर वेडने हवेत शॉट मारला जो अधिक लांब जाऊ शकला नाही आणि जडेजाने आपल्या क्षेत्ररक्षण कौशल्याचे प्रदर्शन करत जबरदस्त कॅच पकडला. वेडने 30 धावा केल्या. त्यानंतर लाबूशेन आणि हेडच्या जोडीने संघाला आणखी फटका बसू दिला नाही व आपली विकेट सांभाळत संघाची धावसंख्या 50 पार नेली.

दरम्यान, MCG मध्ये सुरु असलेला सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 100वा कसोटी सामना आहे. विशेष 1932 मध्ये भारताच्या कसोटी प्रवासाला सुरुवात झाली तर स्वतंत्र देश म्हणून टीम इंडियाने आपला पहिला कसोटी सामना 1947-48 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.