ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 3: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या डावात 244 धावा करणारी टीम इंडिया (Team India) तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात 9 बाद 36 धावांवर कोसळली. यादरम्यान मोहम्मद शमी एक धाव करून दुखापतग्रस्त झाल्याने भारताने आपला डाव 36 धावांवरच घोषित केला आणि आता ऑस्ट्रेलिया संघाला (Australian Team) विजयासाठी 90 धावांचे माफक लक्ष्य दिले. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी भारतीय फलंदाजी क्रम अशाप्रकारे गडगडल्याने टीम प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. टीम इंडियाचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या ओलांडू शकला नाही. जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मयांक अग्रवाल, साहा आणि अश्विनसारखे फलंदाजांना एकामागोमाग एक माघारी धाडत ऑस्ट्रेलियाने भारताला बॅकफूटला टाकलं. (IND vs AUS 1st Test Day 3: ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याने भारताची उडवली भंबेरी, पिंक-बॉल टेस्ट मॅचमध्ये कांगारूपुढे 90 धावांचे लक्ष्य)

पिंक-बॉल कसोटीत भारताच्या कामगिरीने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात असून संतापात नेटकऱ्यांनी संघावर टीकास्त्र डागले. अनेकांनी शास्त्री यांना ट्रोल केलं तर काहींनी राहुल द्रविडला प्रशिक्षक बनवण्याची मागणी केली. पाहा ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या हाराकिरीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

लाज काढली!!

शास्त्रींना काढा

रवि शास्त्री

खरोखर अपमानास्पद!

रवि शास्त्री ट्रोल!!

सर्वात कमी धावसंख्या

नवीन विश्वविक्रम

सर्वात खराब 45 मिनिटं

भारताने तिसऱ्या दिवशी 1 बाद 6 धावांवर खेळण्यास सुरुवात खेळी आणि रात्रीच्या जेवणापूर्वी 30 धावांवर 8 विकेट गमावल्या. दरम्यान, टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या होती. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये 1974 मध्ये भारताने तिसऱ्या डावात अवघ्या 42 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात 191 धावांवर रोखल्यावर भारताने 53 धावांची आघाडी घेतली आणि दिसवासाखेर 62 धावांनी आघाडी वाढवली, मात्र दुसऱ्या डावात एकही भारतीय फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही आणि जोश हेझलवूड-पॅट कमिन्सच्या चूक मारण्यापुढे गुडघे टेकले.