हार्दिक पांड्या (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट (India Vs Australia) संघाला लाजीरवाणा पराभवाला सामोरे जावा लागले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारली आहे. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 8 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मिळवलेल्या ऐतिहासि विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू संध्या आनंद साजरा करण्यात मग्न आहेत. मात्र, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वांद्रे (Bandra) येथील परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून बाहेर येताना दिसला आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही हार्दिकने आक्रमक फलंदाजी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या दौऱ्यावर हार्दिकची एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती. त्यानंतर तो भारतात परतला आहे. मायदेशी परतल्यानंतर हार्दिक पांड्या आज एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून बाहेर येताना दिसला आहे. तसेच हार्दिक काय खरेदी करण्यासाठी या दुकानात गेला होता? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. हे देखील वाचा- IND Vs AUS 2nd Test: भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजून एक मोठा धक्का; आयसीसीने ठोठावला सामना शुल्काचा 40 टक्के दंड

फोटो-

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना हार्दिक पांड्याने एकदिवसीय कारकिर्दीत 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. एवढेच नव्हेतर, एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हार्दिक केवळ 857 बॉलवर 1 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. याआधी केदार जाधवने 937 बॉलवर 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.