Scotland National Cricket Team vs Australia National Cricket Team, 2nd T20I Scorecard: स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज एडिनबर्ग येथील ग्रँज क्रिकेट क्लबमध्ये खेळवला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 70 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या सामन्यात 80 धावांची झटपट खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड आपले खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 196 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक 103 धावांची खेळी खेळली. जोश इंग्लिसने अवघ्या 43 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान जोश इंग्लिसने सात षटकार आणि सात चौकार लगावले. जोश इंग्लिसशिवाय कॅमेरून ग्रीनने 32 धावा केल्या. स्कॉटलंडकडून ब्रॅडली करीने सर्वाधिक तीन बळी घेतले. ब्रॅडली करीशिवाय क्रिस्टोफर सोलने एक विकेट घेतली.
Four wickets for Stoinis and two for Cameron Green, as Australia go 2-0 easily in Edinburgh https://t.co/bx7Vp4rAAT #SCOvAUS pic.twitter.com/siFvWvI7zP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 6, 2024
हा सामना जिंकण्यासाठी स्कॉटिश संघाला 20 षटकात 197 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात काही खास झाली नाही आणि संघाचे दोन फलंदाज अवघ्या 20 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत अवघ्या 126 धावांत गारद झाला. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक 59 धावांची खेळी खेळली.
हा सामना जिंकण्यासाठी स्कॉटिश संघाला 20 षटकात 197 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात काही खास झाली नाही आणि संघाचे दोन फलंदाज अवघ्या 20 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत अवघ्या 126 धावांत गारद झाला.
स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक 59 धावांची खेळी खेळली. ब्रँडन मॅकमुलेनशिवाय जॉर्ज मुनसेने 19 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्कस स्टॉइनिसशिवाय कॅमेरून ग्रीनने दोन बळी घेतले. स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवार, 8 सप्टेंबर रोजी एडिनबर्ग येथील ग्रेंज क्रिकेट क्लब येथे संध्याकाळी 6.30 वाजता खेळवला जाईल.