Most Centuries In IPL History: आयपीएलच्या इतिहासात 'या' गोलंदाजांना वाटते फलंदाजांची भीती, झळकावली आहेत सर्वाधिक शतके; पाहा टॉप 5 ची यादी
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे. आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी शतक ठोकणे फार मोठी गोष्ट मानली जात नाही. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. (हे देखील वाचा: Most Sixes In IPL By Team: आयपीएलच्या इतिहासात 'या' संघानी केला कहर, ठोकले सर्वाधिक षटकार; एका क्लिकवर पाहा आकडेवारी)

आयपीएलमध्ये 'या' फलंदाजांनी सर्वाधिक शतके ठोकली आहेत

विराट कोहली: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या लीगच्या इतिहासात 'रन मशीन' कोहलीने आतापर्यंत एकूण 7 शतके झळकावली आहेत. विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये पन्नास अर्धशतकं पूर्ण केली आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 237 सामने खेळले आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 7263 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या स्पर्धेत 7 शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत.

ख्रिस गेल: विराट कोहलीनंतर माजी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे नाव या यादीत आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये एकूण सहा शतके झळकावली आहेत. ख्रिस गेलने 142 सामन्यात 4965 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध 175 धावांची नाबाद खेळी खेळली.

जोस बटलर: आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणारा जोस बटलर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या इतिहासात जोस बटलरने या स्पर्धेत एकूण 5 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर जोस बटलरनेही या स्पर्धेत 19 अर्धशतके झळकावली आहेत. जोस बटलरने 96 सामन्यात 3223 धावा केल्या आहेत.

केएल राहुल: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचे नाव आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये केएल राहुलने 118 सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत, तर केएल राहुलने 33 अर्धशतकेही झळकावली आहेत. या कालावधीत 4163 धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर: दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 176 सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. मात्र, या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके डेव्हिड वॉर्नरच्या बॅटने केली आहेत. डेव्हिड वॉर्नरसोबत शेन वॉटसननेही लीगमध्ये चार शतके झळकावली आहेत.