'इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेटची पुरती वाट लावली'- जावेद मियांदाद यांची पाकिस्तान पंतप्रधानांवर टीका
Javed Miandad (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानी क्रिकेटचे (Pakistan Cricket) मोठे नुकसान केले, अशी टीका लोकप्रिय पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद (Javed Miandad) यांनी केली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डमध्ये क्रिकेटबद्दल अज्ञान असणाऱ्या व्यक्तींची निवड करुन इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेटची पूरती वाट आहे.

युट्युबवर रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये जावेद मियांदाद असे म्हणाले की, "पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पोर्ट्सबद्दल A, B, C देखील माहिती नाही. मी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी स्वतः या विषयावर चर्चा करणार आहे. देशासाठी योग्य नसलेल्या कोणत्याही माणसाला मी बोर्डावर काम करु देणार नाही." पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे सीईओ वसिम खान यांना अप्रत्यक्षरित्या उद्देशून मियांदाद असे म्हणाले की, "तुम्ही एका परदेशी माणसाला बोर्डावर नियुक्त केले आहे. जर त्याने आपल्याकडून काही चोरले तर तुम्ही त्याला कसे पकडाल?"

"सध्या पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे मला चांगले भविष्य बघायचे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने खूप खेळाडूंना क्रिकेटमधील संधी काढून त्यांना बेरोजगार केले आहे. या पूर्वीही मी या विषयावर बोललो आहे. परंतु, त्यांना या गोष्टीचे गांभीर्य अद्याप समजलेले नाही," असेही ते म्हणाले.

यापूर्वी मियांदाद असे म्हणाले की, "मी तुझा कॅप्टन होतो. तु माझा कॅप्टन नव्हतास. मी राजकारणात येईन आणि मग तुझ्याशी बोलेन. या सर्व काळात मी तुला लीड केलं आहे. परंतु, आता तु स्वतः देव असल्यासारखा वागत आहे. देशात तु फक्त एकटाच हुशार आहेस असं वावरतोस." पुढे ते म्हणाले, तुम्हाला या देशाची काळजी नाही. तुम्ही माझ्या घरी आलात आणि पंतप्रधान बनलात. पाकिस्तानी असण्याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे सर्व पाकिस्तानच्या सामान्य जनतेचे म्हणणे आहे. परंतु, सामान्य जनता आवाज उठवू शकत नाही. म्हणून त्यांच्या वतीने मी बोलत आहे, असे मियांदाद म्हणाले.

मियांदाद यांनी पाकिस्तानसाठी 124 कसोटी सामने तर 233 वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये त्यांनी 8832 धाव्या केल्या असून वनडे मध्ये 7381 धावा केल्या आहेत.