
CSK vs MI IPL 2025 Chennai Weather Update Today: आयपीएल 2025 (IPL 2025) चा सर्वाच रोमांचक सामना आज होत आहे. कारण चेन्नईमध्ये दोन बलाढ्य संघ आमने-सामने येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट पडले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चेन्नईमध्ये पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.
हवामान कसे राहील, आयएमडीचा इशारा
आयएमडीच्या अहवालानुसार, 23 मार्च रोजी चेन्नईमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच, हलक्या ते मध्यम पावसासह गडगडाटी वादळे येऊ शकतात. तापमान 27 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, त्यामुळे दमट वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर खेळात व्यत्यय येऊ शकतो. पाऊस थांबेपर्यंत सामना थांबवावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी करावी लागू शकते. अशा परिस्थितीत, संघांना वेगळी रणनीती स्वीकारावी लागू शकते.
Chennai Braces For Heavy Rain During CSK vs MI IPL Match Today as IMD Predicts Thunderstormshttps://t.co/46t5oiS0TL
— TIMES NOW (@TimesNow) March 23, 2025
आणखी पाऊस पडेल का?
हवामान खात्याच्या मते, 23 मार्चनंतर पावसाची शक्यता कमी होईल. 24 मार्च ते 28 मार्च दरम्यान हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे आणि तापमान 28 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. म्हणजेच, आजचा पाऊस तात्पुरता अडथळा ठरू शकतो, परंतु स्पर्धेचा उत्साह अबाधित राहील.