विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील ही लढत रंगणार आहे. सामन्यादरम्यान हवामानावर कोणाचाही जोर नसतो. पावसामुळे काही सामन्यांमध्ये व्यत्ययही आला आहे. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यातही पावसाने दणका दिला, तर सामन्याचा निकाल कसा लागणार? तर आम्ही याचं उत्तर घेऊन आलो आहोत. (हे देखील वाचा: IND-AUS Team Dinner Party: भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ एकत्र करणार डिनर, साबरमती रिव्हरफ्रंट क्रूझवर आयोजित केला जाणार कार्यक्रम)
बाद फेरीच्या सामन्यांसाठी बोर्डाने आधीच राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर केला जाईल. आता हा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच येत असेल की दुसऱ्या दिवशीही पाऊस असाच सुरू राहिला तर सामन्याचा निकाल काय लागेल? त्यामुळे अशा स्थितीत दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
सामना टाय झाल्यास आयसीसीचा विशेष नियम लागू होईल:
विश्वचषक 2019 चा अंतिम सामना नक्कीच लक्षात राहीला असेल. चौकार मोजून इंग्लंडचा संघ विजेता ठरला. यानंतर क्रिकेट विश्वात मोठा भूकंप झाला.
मात्र, यावेळी हा नियम पाहायला मिळणार नाही. आयसीसीने या स्पर्धेसाठी काही खास नियम केले आहेत. अंतिम सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरद्वारे सामना विजेता ठरविला जाईल.
सुपर ओव्हरमध्येही स्कोअर समान राहिल्यास सुपर ओव्हर पुन्हा घेण्यात येईल. सामना विजेत्याचा निर्णय होईपर्यंत हे सुरू राहील. काही कारणास्तव सुपर ओव्हर पूर्ण झाली नाही, तर अशा परिस्थितीतही दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.