(Image Credit: Twitter)

विश्वकपमध्ये भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड सुरु ठेवलेली आहे. भारतीय संघाने अजून 4 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यंदाच्या इंग्लंड (England) मधल्या विश्वकप ने सगळ्या चाहत्यांना याड लावलाय. याचच एक उदाहरण सांगायचं म्हणजे माजी क्रिकेटपटू वीरेंदर सेहवाग (Virender Sehwag) ने शेअर केलेला हा फोटो. या फोटोमध्ये सेहवाग आपली पत्नी आरती (Aarti)चा गाला आवळताना दोस्तोय. फोटो बघायला जितका मजेदार आहे त्याचे कॅप्टशन ही तितकेच मजेशीर आहे.

फोटो शेअर करताना सेहवाग म्हणतो, 'जे भारतीय संघ सध्या विरोधी संघाचे करत आहे'. सेहवागचे फोटो कॅप्टशन जितके विनोदि आहे नेटकऱ्यांनी तेव्हढीच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे.

पाजी लागेल

पोलिस केस होईल हो...

हा हा ... वीरू पजी ... विचार करून ट्विट करा, महिला मुक्ती मोर्चावाल्यांना वाईट वाटेल आणि आपले गृहमंत्री ना देखील

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वकपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान शी 22 जूनला एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल. मात्र, खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाच्या चिंतेत भर पडत आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना दुखापत झाल्याने तो काही सामने खेळू शकण्याचे बोलले जात आहे.