भारताने ICC महिला T20 वर्ल्डकपमध्ये विजयाची हॅट्रिक करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आयलॅंडच्या संघावर मात करून भारतीय संघ विजयी ठरला आहे. वर्ल्डकपमध्ये तिसर्यांदा महिला भारतीय क्रिकेट संघ पोहचला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना यंदा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर भारताच नाव असाव ही आशा वाढत आहे.
मिताली राज या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ठरली आहे. अर्धशतक ठोकत मितालीने आयलॅंड संघासमोर 146 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र त्याचा पाठलाग करताना आयलॅंड संघाची दमझाक झाली होती. भारताने आयलॅंडवर 52 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
17 नोव्हेंबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत लढणार आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये कोणता संघ बाजी मारत आहेत हे पाहण उत्सुकतेच ठरणार आहे.