Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील (PAK vs BAN) पहिला सामना 21 ऑगस्टपासून (बुधवार) रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तान कसोटी मालिकेनंतर बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही कसोटी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलचा भाग आहेत. (हे देखील वाचा: ENG vs SL 1st Test Live Streaming: इंग्लंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून होणार सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद)
हेड टू हेड रेकॉर्डवर पाकिस्तानचे वर्चस्व
WTC 2023-25 गुणतालिकेत पाकिस्तान सध्या सहाव्या तर बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकमेकांविरुद्ध 13 कसोटी सामने खेळले आहेत. पाकिस्तानने 12 विजय आणि 1 ड्रॉ मिळवून कसोटीतील हेड टू हेड रेकॉर्डवर वर्चस्व राखले आहे. दरम्यान, भारतात या मालिकेचे थेट प्रेक्षपण कुठे होणार आहेत हे आम्ही या लेखाद्वारे सांगणार आहोत.
किती वाजता सुरु होणार सामना?
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून (बुधवार) रावळपिंडी येथील खेळवला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 खेळवला जाणार आहे. तर नाणेफेक 10 वाजता होईल.
कुठे पाहणार लाइव्ह?
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका भारतात प्रसारित केली जाणार नाही, कारण कोणत्याही चॅनेलने सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकार घेतलेले नाहीत. म्हणजेच भारतातील लोकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर पाहता येणार नाही.
पाकिस्तान संघ : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद हुरैरा, सैम अयुब, सौद शकील, आगा सलमान, कामरान गुलाम, आमेर जमाल, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, मीर हमजा, अबरार अहमद, मोहम्मद अली, खुर्रम शहजाद , नसीम शाह, शाहीन आफ्रिदी
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, शकीब अल हसन, मेहदी हसन मिराज, झाकीर हसन, लिटन दास, मुशफिकुर रहीम, हसन महमूद, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, शरीफुल इस्लाम, नाहीद राणा, नईम हसन