DC vs RCB 55th IPL Match 2020: आयपीएल (IPL) 2020 मध्ये आज लीग टप्प्यातील 55वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. आज अबू धाबी येथे होणाऱ्या या सामन्यात विजयी संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय ठरेल तर पराभूत संघावर स्पर्धेतून बाहेर पाडण्याचे संकट ओढवेल. अप्रत्यक्षपणे, दोन्ही संघांमधील हा सामना एक प्रकारचा उपांत्यपूर्व सामना असेल, विजयी संघ क्वालिफायर-1 मध्ये पोहोचेल. बेंगलोर आणि दिल्लीचे 13 सामन्यात 14 गुण असून ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. विजयी संघ पहिल्या दोनमध्ये पोहोचेल, जेणेकरून त्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील, त्यामुळे आजची स्पर्धा रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. चालू हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. यापूर्वी लीग सामन्यात दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा 59 धावांनी पराभव केला होता. मागील काही सामने दोन्ही संघांसाठी अतिशय निराशाजनक राहिले आहेत. दिल्लीने सलग चार तर आरसीबीला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.