How to Download Hotstar & Watch RR Vs PBKS IPL 2021 Match 4: राजस्थान रॉयल विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (Photo Credit: Instagram)

How to Watch SRH vs KKR IPL 2021 Match 4: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आज आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) चौथा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium Mumbai) हा सामना खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व संजू सॅमसन (Sanju Samson) करणार आहेत. तर, पंजाब किंग्ज संघाचे कर्णधार पद के.एल राहुल (K.L. Rahul) याच्याकडे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे 14 वे हंगाम प्रेक्षकांविना पार पडणार आहेत. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघातील आयपीएलचा चौथा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- Suresh Raina ने केला आपल्या First Crush चा खुलासा; कॉलेज जीवनात 'या' मराठी अभिनेत्रीसोबत डेटवर जाण्याची होती इच्छा

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.