How to Download Hotstar & Watch DC vs SRH, Qualifier 2 Live: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर 2 लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे?
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Photo)

DC vs SRH Qualifier 2 Match: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात विजयी होणार संघ आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) मुंबई इंडियन्सचा विजेते पदासाठी सामना करेल. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी दुबई येथे खेळला जाईल. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात यापूर्वी दोन सामने झाले असून डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने दोन्ही वेळी विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दिल्लीविरुद्ध हैदराबादचे पारडे जड मानले जात आहे. हैदराबादने मागील चार सामन्यात विजय मिळवून आपले ताकद दर्शवली आहे तर दिल्लीचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. दिल्ली संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पहिल्यांदा फायनल गाठण्याच्या प्रयत्नात असेल, तर हैदराबाद 2016 नंतर दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. (IPL 2020 Qualifier 2 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर-2 लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याच्या स्टेप्स:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.