ICC T20 World Cup 2024 Final: शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि एडन मार्करामच्या (Aidan Markram) नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) संघ यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना ज्याप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला होता, त्याचप्रमाणे अंतिम सामन्यासाठीही अशीच शक्यता आहे. परंतु संपूर्ण सामना रद्द घोषित केला जाईल इतका नाही. दरम्यान, पावसाची संभाव्यता काय आहे आणि पाऊस पडल्यास नियम काय असतील हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. कारण आयसीसीने (ICC) सेमीफायनल आणि फायनलसाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. याची घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी राखीव दिवस असेल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने त्यासाठी राखीव दिवस आधीच जाहीर केला आहे. याआधी खेळल्या गेलेल्या सेमीफायनल 1 साठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता, पण त्याची गरज नव्हती. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद नव्हती. यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला होता. यादरम्यान दुसरा उपांत्य सामनाही संपला होता. त्यामुळे केवळ क्रिकेट चाहत्यांनीच नाही तर आयसीसीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. (हे देखील वाचा: IND vs SA Final Umpire: बोबंला! फायनलपूर्वी रोहित सेनेसाठी तणावाची बातमी, आयसीसीने फायनलसाठी पंचांची केली घोषणा)
पहिल्या दिवशी 10 षटकांचा सामना होऊ शकला नाही तरच राखीव दिवस वापरला जाईल
टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, असे आयसीसीने आधीच जाहीर केले आहे, परंतु पहिल्या दिवशी सामना खेळला जाणार नसेल तरच हा राखीव दिवस वापरला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार पहिल्या दिवशी किमान 10 षटकांचा सामना व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, कोणताही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल तर किमान 5 षटकांचा सामना असणे आवश्यक आहे, त्यानंतरच निकाल जाहीर केला जातो. परंतु यापेक्षा कमी षटकांच्या सामन्यांचा निकाल जाहीर केला जात नाही. पण टी-20 विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत किमान 10 षटकांचे सामने होणे आवश्यक आहे.
फायनलसाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे
हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की पहिल्या दिवशी दहा षटकांचा सामना देखील खेळला गेला नाही, तर तो सामना फक्त दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी खेळला जाईल. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी सामना सुरू झाला आणि त्यानंतर सामना खेळता आला नाही आणि दुसऱ्या दिवशी गेला, तर पहिल्या दिवशी जिथे सामना थांबला होता तिथूनच सामना सुरू होईल. फायनलसाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे, म्हणजेच सामना तीन तास दहा मिनिटे अधिक चालू शकतो.
अंतिम सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल
शनिवारी, सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 10 वाजता होईल. रविवारी राखीव दिवशीही सामना त्याच वेळी सुरू होईल. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी दहा षटकांचा सामनाही एकत्र खेळला गेला नाही तर अंतिम दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
बार्बाडोस मध्ये हवामान अंदाज
AccuWeather च्या अहवालानुसार, 29 जून रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोसमध्ये दिवसभर पावसाची शक्यता 78% पर्यंत आहे. यासोबतच जोरदार वारेही वाहू शकतात आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. रात्री पावसाची शक्यता 87 टक्के आहे. 30 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे. मात्र या दिवशीही पावसाचा धोका असून पाऊस क्रिकेट चाहत्यांची मजा खराब करु शकतो. 30 जून रोजी पावसाची शक्यता 61 टक्के आणि रात्री 49 टक्क्यांपर्यंत आहे. अशा स्थितीत राखीव दिवशीही सामना होण्याची शक्यता नाही.