India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आता हा सामाना रोमांचक वळणावर आला आहे. दरम्यान दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवर गारद झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला.
Middle stump out of the ground! 🎯
An absolute Jaffa from Jasprit Bumrah to wrap the 2nd innings 🔥
Bangladesh are all out for 146
Scorecard - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TwdJOsjR4g
— BCCI (@BCCI) October 1, 2024
भारतीय गोलंदाजांचा कहर
दुसऱ्या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लामने 50 धावा तर मुशफिकर रहीमने सर्वाधिक खेळी केली. तर भारतीय गोलंदाजाकडून घातक हल्ला करण्यात आला. जसप्रीत बुमराह 3, आर अश्विन 3, रवींद्र जडेजा 3 अश्या विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Michael Vaughan On Team India: भारताच्या आक्रमक फलंदाजीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचं मोठं वक्तव्य, एका ओळीच्या पोस्टने उडवून दिली खळबळ)
मोमिनुल हकने केल्या नाबाद 107 धावा
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगालदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने पहिल्या डावात दहा विकेट गमावून 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमिनुल हकने नाबाद 107 सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन आणि सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
रोहित-जैस्वालची आक्रमक फलंदांजी
प्रत्युत्तरात भारताने 285 धावांवर 9 विकेट गमावून डाव घोषित केला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी स्फोटक फलंदाजी केली. यशस्वीने 51 चेंडूत 72 तर रोहित शर्माने 3 षटकाराच्या जोरावर 11 चेंडूत 23 धावा केल्या. तसेच केएल राहुल (68) आणि विराट कोहलीने (47) आक्रमक अवतार दाखवला. तर दुसरीकडे मेंहदी हसन मिराज आणि शकिब अल हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या.