PC-X

Hardik Pandya and Sai Kishore: आयपीएल 2025 स्पर्धेत काल (IPL) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान आर. साई किशोर आणि हार्दिक पांड्या यांच्यात वाद झाला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फलंदाजी करत असताना साई किशोर (Sai Kishore) गोलंदाजीसाठी आला. यावेळी साई किशोरने हार्दिक पांड्याला एक चांगला चेंडू टाकला. हा चेंडू सहजरित्या हार्दिक पांड्याने खेळला आणि चेंडू गोलंदाजी करत असलेल्या साई किशोरकडे गेला. यानंतर साई किशोर हार्दिक पांड्याकडे पाहत राहिला. हार्दिक पांड्यानेही त्याला रागात पाहिले आणि चल नीघ...असं म्हणाला. यावेळी अंपायरही मध्यस्थीला धावल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलमध्ये अशा प्रकारचे संघर्ष अनेकदा पहायला मिळतात. यंदा मात्र, अद्याप असे काहीही दिसलेले नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात, केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर अशाच एका वादामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. तसं हार्दिक पंड्या आणि साई किशोर यांच्या बाबतीत अद्याप घडलेले नाही.

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 4 गडी राखून पराभूत केलं होतं. त्यानंतर गुजरात टायटन्सने 36 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय उलटा पडला. कारण गुजरात टायटन्सने दिलेल्या धावा गाठणं मुंबईला जमलं नाही. दिग्गज फलंदाज फेल गेले.