रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) मंगळवारी सांगितले की, टीम इंडियाचे (Team India) फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या षटकांमध्ये संघर्ष करताना दिसतात. तो म्हणाला की या फॉरमॅटमध्ये रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) पलीकडे पाहण्याची आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्या जोडीला परत आणण्याची वेळ आली आहे. ही फिरकी जोडी ‘कुलचा’ म्हणून ओळखली जाते. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेगस्पिनर चहल संघर्ष करताना दिसले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी, केशव महाराज आणि पार्ट-टाइम गोलंदाज एडन मार्करम या त्रिकुटाने शानदार गोलंदाजी केली. (ICC T20 विश्वचषकपूर्वी पुन्हा एकदा समोर आली टीम इंडियाची ‘ही’ सर्वात मोठी समस्या, नाही काढला तोडगा तर हाती लागणार पुन्हा निराशा)

2017 नंतर प्रथमच एकदिवसीय संघात पुनरागमन केलेल्या अश्विनने तिसऱ्या वनडेत बाकावर बसण्यापूर्वी 2 सामन्यांत केवळ एक विकेट घेतली होती. तर चहलने केवळ 2 विकेट्स घेतल्या, मधल्या षटकांमध्ये संघर्ष केला. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना हरभजन म्हणाला, “मला वाटते की या दोघांनी (इशांत शर्मा आणि अश्विन) टीम इंडियासाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे, मग तुम्ही कसोटी क्रिकेट किंवा वनडे क्रिकेटबद्दल बोला. अश्विनचा आदर ठेवून, मला वाटते की तो आहे. एक चॅम्पियन गोलंदाज, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये, मला वाटते, भारताने एक पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, कदाचित कोणीतरी जो चेंडू आत आणि बाहेर काढू शकेल. कुलदीप यादवसारखा कोणीतरी उत्तम पर्याय असू शकतो. आपण ‘कुलचा’ संयोजनाकडे परत का जात नाही आणि ते टेबलवर काय आणू शकतात ते का पाहू नये? त्यांनी भारतासाठी सामने जिंकले. त्यांच्याकडे परत जाणे ही चांगली गोष्ट असेल.” कुलदीप आणि चहलने एकत्र 36 वनडे सामने खेळले व 2017 ते 2021 दरम्यान त्यांनी एकूण 125 विकेट्स घेतल्या.

“तुम्हाला कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल सारख्या खेळाडूंची गरज आहे. तुम्ही दुसरा एक्स-फॅक्टर देखील आणू शकता, वरुण चक्रवर्ती सारखा, त्याला पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही. विश्वचषकातील त्या 2-3 सामन्यांमध्ये तुम्ही त्याला खेळवले. आणि तुम्ही ठरवले ठीक आहे, तो पुरेसा चांगला नाही,” तो पुढे म्हणाला. भारताचा पुढील एकदिवसीय सामना अहमदाबाद येथे 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाहुण्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला जाईल.