GT (Photo Credit- X)

RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025चा 47 वा (IPL 2025) सामना 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) खेळवला जात आहे. आजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

बटलर-गिलची वादळी खेळी

प्रथम फलंदाजी करताना  गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 209 धावा केल्या.  गुजरात टायटन्सडून कर्णधार शुभमन गिलने 84 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, गिलने 50 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, साई सुदर्शनने 39 तर जोस बटलरने 50 धावा केल्या.

महेश थीकशनाने घेतल्या दोन विकेट

दुसरीकडे, फिरकीपटू गोलंदाज महेश थीकशनाने राजस्थान रॉयल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. राजस्थान रॉयल्सकडून महेश थीकशनाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत 210 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.